fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsTECHNOLOGY

आकर्षक ओप्‍पो रेनो६ ५जीच्‍या विक्रीला सुरूवात: मीडियाटेक ९०० चिपसेट असलेला भारताचा पहिला फोन

नवी दिल्‍ली,: १४ जुलै रोजी रेनो६ प्रो ५जी व रेनो६ ५जीच्‍या यशस्‍वी सादरीकरणानंतर ओप्‍पो या आघाडीच्‍या जागतिक स्‍मार्ट डिवाईस ब्रॅण्‍डने आजपासून फ्लिपकार्टवर (Flipkart) आणि प्रमुख रिटेलर्सकडे ओप्‍पो रेनो६ ५जीच्‍या (OPPO Reno6 5G) विक्रीला सुरूवात होण्‍याची घोषणा केली.

रेनोच्‍या इंडस्‍ट्री-फर्स्‍ट ग्राहक-केंद्रित तंत्रज्ञान नवोन्‍मेष्‍काराच्‍या वारसाशी संलग्‍न असणारा ओप्‍पो रेनो६ ५जी हा सर्वांगीण स्‍मार्टफोन आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये भारताची पहिली मीडियाटेक डायमेन्सिटी ९०० चिपसेट, तसेच ८ जीबी रॅम, १२८ जीबी रॉम असण्‍यासोबत ओप्‍पोकडून अंतर्गत रॅम विस्‍तारीकरणासाठी सपोर्ट आहे.

काही आकर्षक ऑफर्ससह ओप्‍पो रेनो६ ५जी अरोरा व स्‍टेलर ब्‍लॅक या दोन आकर्षक रंगांमध्‍ये खरेदी करता येईल. ओप्‍पो रेनो६ ५जी आकर्षक ऑफर्ससह फ्लिपकार्टवर २९,९९० रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल. २९ जुलै २०२१ पासून विक्रीला सुरूवात होत आहे.

रेनो६ ५जी हा यंदाच्‍या सीझनमध्‍ये व्हिडिओ क्रिएटर्सनी खरेदी केलाच पाहिजे असा स्‍मार्टफोन आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये इंडस्‍ट्री-फर्स्‍ट बोकेह फ्लेअर पोर्ट्रेट व्हिडिओ हे सिनेमॅटिक बोकेह फ्लेअर इफेक्‍ट आहे, जे प्रोफेशनल-ग्रेड व्हिडिओज कॅप्‍चर करते. तसेच उच्‍च दर्जाच्‍या इमेजिंग क्षमता व एडिटिंग टूल्‍स फोनला तुमचा मिनी पर्सनल स्‍टुडिओ बनवतात.

नवीन रेनो प्रमुख स्‍मार्टफोनमध्‍ये ओप्‍पोची विशेष रेनो ग्‍लो डिझाइन व पाचस्‍तरीय ग्रेडिएण्‍ट प्रोसेस आहे, जे स्‍मार्टफोनला आकर्षक लुक देतात. अद्वितीय एजी ग्‍लास प्रोसेस स्‍मार्टफोनचे बोटांच्‍या ठसांपासून संरक्षण करते, तर हातामध्‍ये मॅट फिलची भावना देते. फोनच्‍या अरोरा रंगामध्‍ये डायमंड आकाराची डिझाइन आहे, ज्‍यामधून विविध कोनांमधून पाहिले असता विविध रंगसंगती दिसतात. हा सडपातळ व आकर्षक कार्यक्षम स्‍मार्टफोन केवळ ७.५९ मिमी जाड असून त्‍याचे वजन फक्‍त १८२ ग्रॅम आहे. तसेच या स्‍मार्टफोनमधील ६५ वॅट सुपर व्‍हीओओसी २.० शक्तिशाली ४३०० एमएएच बॅटरीला जवळपास २८ मिनिटांमध्‍ये १०० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज करू शकते.

या स्‍मार्टफोनमध्‍ये उत्‍पादकतेसह ओप्पोचे कलरओएस ११.३ आहे, तसेच सिस्टिम बूस्‍टर, फ्रीफॉर्म स्क्रिनशॉट्स अशा सुधारित वैशिष्‍ट्यांसोबत एकसंधी अनुभवासाठी इतर काही प्रमुख वैशिष्‍ट्ये देखील आहेत. फोनमध्‍ये बिल्‍ट-इन अॅप, O  रिलॅक्‍स आणि तुम्‍हाला मधुरमय संगीत ऐकण्‍याचा अनुभव देणारे सूथिंग साऊंड्स देखील आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading