Thursday, June 25, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पुणे, रायगड ,रत्नागिरी, कोल्हापूर ,सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पुणे: राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने काय जिल्ह्यात हाहाकार माजवला होता पावसाने विश्रांती घेतली असून पूरग्रस्त जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असताना हवामान विभागाने पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे ,रायगड ,रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी होत असताना उत्तर मध्य महाराष्ट्रात पाऊस जोरात पडण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 30 जुलै पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याच्या शक्यतेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी रायगड ,रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे.
त्यामुळे या भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading