Pune – पानशेत धरण 87 टक्के भरले
पुणे: खडकवासला धरण 100टक्के भरल्यानंतर
आता पानशेत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. पानशेत धरण 10.20 टीएमसी, म्हणजे 87 टक्के भरले आहे तर वरसगाव धरण 80 टक्के ,आणि टेमघर धरण 87 टक्के भरले आहे .सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पातील चार धरणात एकूण 25 300 म्हणजे 80टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
दरम्यान खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला असून 4 हजार 525 क्यूसेकने
पाणी नदीत सोडले जात आहे .अशी माहिती खडकवासला धरण पाटविभागाचे अधिकारी
विजय पाटील यांनी माहिती दिली आहे.
धरण परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. टेमघर धरणात 50 मीमी, वरसगाव मध्ये 25 मीमी, पानशेत मध्ये 28 मिमि, आणि खडकवासला धरण परिसरात 20मिमी पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत आहे.
2 हजार 342 क्यूसेकने पाणी कालव्यात सोडले जात आहे. खडकवासला धरणात 2. 98टीएमसी
पाणी उपलब्ध आहे. तर पानशेत मध्ये 10 . 20 टी एमसीसी, वरसगाव मध्ये 10.40 टीएमसी, आणि टेमघर मध्ये 4.50 टीएमसी पाणी उपलब्ध आहे..
अशी माहिती विजय पाटील यांनी दिली
