Friday, June 26, 2026
Latest NewsPUNE

जनता वसाहतीतील मुलींना स्व-संरक्षणाचे धडे

पुणे : एका हाताने कौले फोडत…फरशीचे एका झटक्यात दोन तुकडे करीत…कोणी आपल्यावर हल्ला केला किंवा अतिप्रसंग केल्यास आपले रक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण देत जनता वसाहतीतील मुलींना कराटे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मुलींनी देखील मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत स्व-संरक्षणाचे तंत्र आत्मसात करण्याची प्रतिज्ञा केली. 

जनता वसाहतीतील मुलींना स्व-संरक्षणाचे धडे मिळावेत यासाठी बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि जनता वसाहत येथील वाघजाई मित्रमंडळ फाऊंडेशनच्या वतीने मोफत कराटे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहेत. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेती तन्वी ओव्हाळ कराटे वर्ग घेणार आहे. 

यावेळी नगरसेविका प्रिया गदादे पाटील, दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात, नाझ इनामदार, कराटेगुरु विक्रम मराठे, डॉ. संजय गायकवाड, साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयूष शाह, वाघजाई मित्र मंडळ अध्यक्ष निलेश पवार, किरण सोनिवाल, गोविंद पवार, शनि मारुती मंडळ अध्यक्ष सचिन पवार, आयाज शेख आणि अमोल कानडे, अनिल लंगडे, विक्रांत हांडे, अमर राव, शंकर राजपूत, नरेंद्र व्यास, नंदू ओव्हाळ, प्राजक्ता गायकवाड हे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 
गणेशोत्सव कार्यकर्ते कै. हमीद इनामदार यांचे नाव या प्रशिक्षण वर्गाला देण्यात आले आहे. जय गणेश व्यासपीठमधील श्री शिवाजी मित्रमंडळ, वीर शिवराज मित्र मंडळ, श्री कालिकामाता मित्र मंडळ, शनिमारुती मंडळ यावेळी  उपस्थित होते. 

प्रिया गदादे म्हणाल्या, मुलींनी योग्य वयात स्व-संरक्षणाचे धडे घ्यायला हवेत. फक्त कार्यक्रम किंवा उपक्रम म्हणून हे शिकू नका, तर जागरुक राहून प्रशिक्षणाचा वापर करा. मुलींनी निडरपणे वागण्याची आणि बोलण्याची गरज आहे. 
कृष्णा इंदलकर म्हणाले, मुलींनी स्व-संरक्षणाचे तंत्र अवगत करुन घेणे आवश्यक आहे. पोलीस हे मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. परंतु समाजातील प्रत्येक मुलीने स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण घ्यायला हवे. असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading