Thursday, June 25, 2026
BusinessLatest News

प्रत्येक भारतीयासाठी संपत्ती निर्माता व्हावे – नवनीत मुनोत 

पुणे : एचडीएफसी एएमसीमध्ये लोक, प्रक्रिया, उत्पादन, कामगिरी, उपस्थिती, भागीदारी आणि व्यासपीठ या सर्व बाबतीतील संधींचे सोने करण्यासाठी एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत मुनोत भागधारकांना संबोधित करताना म्हणाले की, जगातील सर्वाधिक आदरणीय मालमत्ता व्यवस्थापक या धाडसी दृष्टीकोनासह भारताचा विकासाचा प्रवास सुरु असल्यामुळे प्रत्येक भारतीयासाठी संपत्ती निर्माता व्हावे, ही फंड हाऊसची महत्वाकांक्षा आहे.

इक्विटी प्रॉडक्ट पोर्टफोलिओच्या विस्ताराबद्दल भागधारकांशी बोलताना मुनोत म्हणाले, मालमत्ता वर्गांमध्ये/ धोका पत्करण्याच्या विभागात विविध प्रकारच्या ग्राहकांच्या गरजा भागविणारी विविध प्रकारची उत्पादने आज आम्ही सादर करत आहोत. आम्ही सतत संधींचा मागोवा घेत आहोत. पण दीर्घकाळासाठी आमच्या ग्राहकाच्या पोर्टफोलिओमध्ये मूल्यात्मक वाढ होत आहे, याची खात्री होत नाही तोवर कोणतेही उत्पादन/सुविधा निर्माण करण्यापासून आम्ही परावृत्त होतो.

आर्थिक वर्ष २०-२१ मध्ये आम्ही एचडीएफसी डिव्हीडंड यील्ड फंड आणि एचडीएफसी बँकिंग ईटीएफ सादर केला. इक्विटी बाजारपेठ विक्रमी उच्चांका वर आणि व्याजदर नीचांकी पातळीवर असताना गुंतवणूकदार पोर्टफोलिओ परताव्यामध्ये चांगला समतोल साधण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. आमचे हायब्रीड फंड्स आणि मालमत्ता वाटप प्रेरित उत्पादने गुंतवणूकदारांना त्यांची मालमत्ता वाटपात समतोल साधायला सक्षम करतात .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading