Thursday, June 25, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शाळा फीमध्ये 15 टक्के कपात, लवकरच अध्यादेश

मुंबई :  शालेय शिक्षण विभागाच्या 15 टक्के फी कपातीला मंत्रीमंडळ बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. कोरोना काळात राजस्थान मध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला. लवकरच राज्य सरकार याबाबत अध्यादेश काढणार आहे.

करोना काळात पालकांचे उत्पन्न कमी झालेल असताना पालकांकडे फीसाठी तगादा लावण्यापेक्षा शाळेनी फी भरण्याच स्ट्रक्चरच केल पाहिजे. जेणेकरुन एकही विद्यार्थी शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही. शाळा ऑनलाईन असल्याने किमान 15 टक्क्याने फीमध्ये कपात केली गेली पाहिजे, असे सुप्रिम कोर्टाने सुचवले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, करोना काळातील ऑनलाईन शिक्षण आणि त्याबदल्यात आकारले जाणारी अवाजवी शालेय फी, शाळांची आरेरावी तसेच काही शाळांनी जबरदस्तीने केलेली फी वसुली, अशा अनेक तक्रारी  पालकांकडून वारंवार केल्या जात होत्या. त्यामुळे या निर्णयाने पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading