इंदिरा आयव्हीएफने गाठला ८५ हजार यशस्वी आयव्हीएफ गर्भधारणांचा टप्पा

मुंबई :  वंध्यत्वावरील उपचारांची भारतातील सर्वात मोठी शृंखला इंदिरा आयव्हीएफने ८५ हजार यशस्वी आयव्हीएफ गर्भधारणा पूर्ण केल्या आहेतहा महत्त्वाचा टप्पा गाठणारी ही भारतातील एकमेव शृंखला बनली आहे.  वैद्यकीय तज्ञएम्ब्रयोलॉजिस्ट्स यांचे ज्ञान व कौशल्ये आणि तंत्रज्ञान नैपुण्यांच्या आधारे सतत आगेकूच करत असलेल्या या सिंगल स्पेशालिटी शृंखलेने २५ जुलै रोजीच्या जागतिक आयव्हीएफ दिनाच्या आधी आपल्या या यशाची घोषणा केली आहे.

इंदिरा आयव्हीएफने वंध्यत्वाशी जोडले गेलेले कलंक कायमचे पुसून टाकण्यासाठी प्रयत्न केले आहेत.  भारतात एखाद्या जोडप्याला मूल होत नाही याचा दोष अगदी सहजपणे महिलेच्या माथी मारला जातोपण संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की वंध्यत्व हे स्त्री आणि पुरुष यांच्यापैकी कोणातही असू शकते.

देशभरात इंदिरा आयव्हीएफची ९६ केंद्रे असून त्यापैकी बहुतांश द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये आहेत.  यामुळे अगदी दुर्गम भागातील लोकांना देखील वंध्यत्वावरील उपचार करून घेणे शक्य झाले आहे. इंदिरा आयव्हीएफचा उच्च यश दर आणि रुग्णांना केंद्रबिंदू मानून काम करण्याची पद्धत यामुळे मूल होण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या जोडप्यांच्या मनात त्यांच्याविषयी विश्वासाचे स्थान निर्माण झाले आहे.

या यशाविषयी इंदिरा आयव्हीएफचे सीईओ व सहसंस्थापक डॉ. क्षितिज मुरडिया यांनी सांगितले,आमच्या रुग्णांवर आम्ही किती मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रभाव निर्माण करू शकलो आहोत ते पाहताना खूप आनंद होत आहे.  जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आमचा मुख्य उद्देश समाजाचा या समस्येकडे  बघण्याचा दृष्टीकोन बदलणे हा होता आणि आम्हाला खूप समाधान वाटते कीआज अनेक लोक वंध्यत्वावर वैद्यकीय उपचार घेऊ इच्छित आहेत.  आम्ही आमच्या रुग्णांवर सुरक्षित उपचार करतो हा विश्वास महामारीच्या काळात देखील ढळला नाही हे आमच्या या यशातून दर्शवले गेले आहे.”

त्यांनी पुढे सांगितले, “जागतिक आयव्हीएफ दिन हा प्रजनन तंत्रज्ञानाच्या इतिहासातील एक लक्षणीय दिवस आहे४३ वर्षांपूर्वी १९७८ साली याच दिवशी पहिले आयव्हीएफ बाळ जन्माला आले.  आता आपण या क्षेत्रात बरीच मोठी मजल मारली आहे.  आर्टिफिशियल इंटेलिजन्सऑटोमेशन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञान सुधारणांमुळे आयव्हीएफ उपचारांच्या यशाला खूप मोठा हातभार लागत आहे. अनेक जोडप्यांचे आई-बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण होताना पाहताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: