‘शार्प’ कडून नवीन कॉम्पॅक्ट मल्टिफंक्शन प्रिंटर लॉन्च
पुणे : शार्प कॉर्पोरेशन, जपानची संपूर्ण मालकीची भारतीय उपकंपनी ‘शार्प बिझिनेस सिस्टम्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ने आज आपल्या ए-४ रंगीत उत्पादन मालिकेचा भाग म्हणून एक नवीन आटोपशीर रंगीत बहुआयामी प्रिंटर बाजारात आणला आहे.
‘एमएक्स–सी ३५७ एफ’ हा गतिमान आणि किफायतशीर किमतीचा ४ -इन-१ एमएफपी आहे. त्यात सुरक्षा वैशिष्ट्ये सामावली असून त्यातून उत्पादकता व कार्यक्षमता वाढते आणि यामध्ये उपलब्ध असलेली जागा महत्वाची आहे. नवीन ए-४ एमएफपीमध्ये कित्येक वेळ बचत करणारी कार्यक्षमता सामावली असून त्यात ४.३ इंचाचे टच पॅनेल आहे व त्यात सोपा असा यूआय मोड सामावला आहे. नवीन ‘एमएक्स–सी ३५७ एफ’मध्ये ३३ पीपीएमचा प्रिंट वेग असून शिवाय त्यात ५० कागद हे रिव्हर्स सिंगल पास फिडर (आरएसपीएफ), ट्रू १२०० x १२०० डीपीआय, २ जीबी रॅम, ड्यूप्लेक्स, नेटवर्क, एअर प्रिंट क्षमता सामावलेली आहे.
ऊर्जा व्यवस्थापन वैशिष्ट्यांमुळे अॅक्टीव्ह व स्लीप मोडमध्ये असताना ऊर्जाबचत होते. ४२४ x ४२१ एमएम अशा आटोपशीर आकारामध्ये हे उत्पादन उपलब्ध असून त्यातून चतुरस्त्र कामगिरी प्राप्त होते. त्यामुळे सर्वच प्रकारच्या व्यवसायांना त्याचा फायदा होतो.
‘एमएक्स–सी ३५७एफ’ दाखल करत शार्पने रंगीत ए-४ आणि ए-३ संमिश्रतेची एक चांगली मालिका उभारली आहे. ‘एमएक्स–सी ३५७ एफ’ची किंमत १,०१,४७८ रुपये असून हे उत्पादन थेट विक्रीने आणि अधिकृत भागीदाराच्या माध्यमातून उपलब्ध आहे. नवीन एमएफपी एसएमई, फ्रंट डेस्क, बीएफएसआय, एनबीएफसी, रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब, वर्क ग्रुप प्रिंटर्स, रिटेल, वर्क फ्रॉम होम आणि उत्पादन क्षेत्राच्या वाढत्या व्यवसाय व कार्यकारी गरजांसाठी उपयुक्त आहे.
या नवीन उत्पादनाबद्दल बोलताना शार्प बिझिनेस सिस्टीम्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शिंजी मिनाटोगवा म्हणाले की “कार्यालय स्वयंपूर्णता उद्योगाची व्याख्याच कोविड-१९ साथरोगाने बदलली आहे आणि आता नवीन संमिश्र कार्य मॉडेल दाखल झाली आहेत. व्यवसाय आता नवनवीन गोष्टी अवलंबत असून त्याद्वारे जागेची बचत होईल व रंगीत एमएफपी किफायतशीर किमतींना मिळतील, याची काळजी घेत आहेत. शार्प गतिमान, उत्पादकता व कार्यक्षमता सुधारण्यासाठी सुरक्षित उपलब्धतेसह वापरण्यास योग्य असे उत्पादन देण्यास कटिबद्ध असून त्याद्वारे सर्वच आकाराच्या व्यवसायांना लाभ होईल.”
