Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे  250 नवीन रुग्ण तर 222 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे : पुणे शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ पाहायला मिळत आहे मध्यंतरी रुग्ण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले होते   परंतु मागील काही दिवसापासून शहरामध्ये दैनंदिन बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक आढळून येत आहे शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने अक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 250 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे . तर 222रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 85हजार 285 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 73हजार 535इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 9तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8720जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 3030अ‍ॅक्टिव्ह रुग्ण  आहेत. यामध्ये 224रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात पुणे शहरातील विविध केंद्रावर 8403स्वॅब  तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading