Breaking News शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणात अटक

मुंबई : प्रसिद्ध उद्योजक आणि बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे अश्लिल चित्रफीत रेकॉर्ड करणे आणि प्रसिद्ध केल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर आज पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा यांच्या विरोधात फेब्रुवारी 2021 मध्ये पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोर्नग्राफ व्हिडीओ रेकॉर्ड करणे आणि तो सोशल माध्यमांवर प्रसिद्ध करण्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. प्राथमिक तपासात राज कुंद्रा यांचे नाव समोर आले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आपल्याकडे अधिक पुरावे असल्याचे सांगत राज कुंद्रा यांना अटक केली. राज कुंद्रा यांना अटक झाल्यामुळे बॉलिवूड आणि उद्योग जगतामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, राज कुंद्राला या अगोदर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कोर्टाची पायरी चढावी लागली होती. मार्च २०२० मध्ये राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मुंबईत राहणारे NRI सचिन जोशी यांनी ही तक्रार दाखल केली होती. 2014 मध्ये झालेल्या एका प्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली होती. सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधित प्रकरण हे प्रकरण होतं. तसेंच अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची याच्यासोबत राज कुंद्रांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. ED ने त्यासंबंधी कुंद्रा यांना नोटीसही बजावली होती. तेव्हा राज कुंद्रा यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: