Friday, September 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रवादीची आणि भाजपची विचारधारा वेगळी, एकत्र येण्याचा प्रश्नच नाही – नवाब मलिक

मुंबई : जोपर्यंत पाण्याचा प्रवाह असतो तोपर्यंतच नदीची दोन टोकं बरोबर असतात पण एकत्र येत नाही. राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी असून त्यात जमीन आस्मानाचे अंतर आहे. त्यामुळे एकत्र येण्याचा प्रश्नच नाही, असा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भेटीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र नवाब मलिक यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.

मलिक म्हणाले, आजच्या घडीला किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर महाविकास आघाडी सरकार तयार करण्यात आलेले आहे. ते व्यवस्थित काम करत असताना काही लोक ‘तारीख पे तारीख’ देत मी पुन्हा येईन असे सांगत आहेत. हवामान खात्याने अंदाज दिल्यावर पाऊस येतो मात्र त्यांचा अंदाज खरा ठरत नाही, असा टोलाही मलिक यांनी यावेळी लगावला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading