Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

कोरोना – पुण्यात गेल्या चोवीस तासात 432 रुग्णांना डिस्चार्ज तर 321 नवीन रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव परत कमी होईला लागली आहे.  मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 321 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे  तर 432रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 83हजार 520 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 71 हजार 909इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 14तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 9 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8685 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2926 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण  आहेत. यामध्ये 234 रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात पुणे शहरातील विविध केंद्रावर 8052 स्वॅब  तपासण्या करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading