SSC Result – यंदा दहावीचा निकाल 99.95 टक्के

पुणे: दहावीचा निकाल ( SSC Result) जाहीर झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदाची  निकालाची टक्केवारी  99.95  टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर जिल्ह्याचा लागला आहे. नागपूर विभागाचा 99.55 टक्के आहे. पूर्नपरिक्षर्थी निकालाची टक्केवारी 90.85 इतकी आहे. 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.
निकालात पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनी पुन्हा अव्वल असून मुलींच्या निकालाची टक्केवारी  99.96% इतकी आहे. मुलांची टक्केवारी 99.94% असून राज्यातील 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 % लागला आहे.
6922 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले असून 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के लागला आहे.

परीक्षा निकालाची प्रक्रिया सगळीच नवीन असून तरीही वेळेत काम पूर्ण झालंय ,सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली असल्याची प्रतिक्रिया दिनकर पाटील दिली आहे. तसंच श्रेणी सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी मिळणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

दहावीचा निकाल हा विद्यार्थ्यांना
http.www.result.mh-ssc.ac.in ह्या साईटवर विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता निकाल पाहता येणार आहे असे दिनकर पाटील यांनी सांगितले

Leave a Reply

%d bloggers like this: