SSC Result : 10 वीच्या निकालाच्या सर्व साइट क्रॅश

पुणे : 10 वीच्या विद्यार्थांनी शिक्षण मंडळाच्या साईटवर निकाल पाहण्यासाठी एकाच वेळी गर्दी केल्याने साइट क्रॅश झाली आहे. त्यामुळे निकाल जाहीर होऊनही तो पाहता येत नसल्याने विद्यार्थी आणि पालकही संतापले आहेत. लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक एकाच वेळी निकाल पाहत होते त्यामुळे या साईटवर हेवी ट्रॅफिक आल्याने हा प्रकार घडला आहे. दरम्यान, घडलेल्या प्रकारा बद्दल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलगीरी व्यक्त केली असून संबंधीत व्यक्तींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरच सिस्टिम पूर्ववत होईल असे सांगितले.   

राज्यातील 10 वीचा निकाल आज जाहीर झाला. निकाल पाहाण्यासाठी यंदा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने result.mh-ssc.ac.in ही नवी लिंक दिली आहे. यासोबतच बोर्डाची नेहमीची अधिकृत लिंक http://www.mahahsscsscboard.in येथेही निकाल पाहता येईल, असे बोर्डाने गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले होते. मात्र दुपारी १ वाजल्यापासून या दोन्ही लिंकवर जाऊन निकाल पाहण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर साईट डाऊन असल्याने विद्यार्थी, पालक त्रस्त झाले. दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट निकाल जाहीर झाल्यापासून अवघ्या ४० मिनिटातच डाऊन झाल्या . निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं होत. मात्र दिवसभर या सर्व साइट हॅंग होत्या. संध्याकाळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून याबाबत स्पष्टीकरण दिले. 

Leave a Reply

%d bloggers like this: