Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest NewsNATIONALTOP NEWS

जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहर उमटवलेल्या जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. गेल्या वर्षी त्यांना ब्रेन स्ट्रोकमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सुरेखा सिक्री यांना त्यांच्या अभिनयासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच रंगभूमीवरील त्यांच्या योगदानासाठी 1989 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ‘बालिका वधु’ मालिकेत ‘दादी सा’ ही त्यांची भूमीकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ‘किस्सा कुर्सी का’ या नाटकातून त्यांनी 1978 मध्ये रंगभूमीवर पदार्पण केले होते. जवळपास 20 वर्ष रंगभूमीवर काम केल्यानंतर त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मालिका व चित्रपटात भूमिका साकारल्या. आयुषमान खुराना यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटातील सुरेखा सिक्री यांची दादी ची भूमिका लक्षवेधी ठरली. त्यांच्या जाण्याने चित्रपट व टीव्ही मालिका क्षेत्रातून हलहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading