Pune – गेल्या चोवीस तासात 283 नवीन कोरोना रुग्ण 268 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 283 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर 268रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 83हजार 199 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 71 हजार 477इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 05 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8680 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 3042 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 229रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात पुणे शहरातील विविध केंद्रावर 7950 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
