वाई-खंडाळा – महाबळेश्वर मतदारसंघात रस्त्यांच्या कामासाठी १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर :आमदार मकरंद पाटील

वाई: वाई-खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते दळणवळणासाठी सोयीस्कर व्हावेत व दळणवळण सुरळीत व्हावे यासाठी राज्याच्या ३०५४ योजनेअंतर्गत विविध रस्त्यांच्या कामासाठी खंडाळा तालुक्याला १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली आहे.

वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील वाहतुकीची सुविधा अधिक सुरळीत व्हावी, ग्रामीण भागातील महाबळेश्वर लोकांच्या दळणवळणाचा मार्ग सुखकर व्हावा, मतदारसंघातील खराब झालेले रस्ते बनवण्यासाठी आ. मकरंद पाटील यांनी ग्रामीण मार्ग दर्जाच्या रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाच्या ३०५४ योजनेतून पाठपुरावा करून ३ कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला आहे.

या योजनेतून दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. खंडाळा तालुक्यातील खंडाळा प्रजिमा १ ते चव्हाणवस्ती (अतिट) रस्ता (३० लाख), खंडाळा प्रजिमा ६ ते घाडगेवस्ती सोटाचामळा (पिंपरे) रस्ता (३० लाख), कोपडे ते तुकाराम तात्या वस्ती- तांबवे रस्ता (३० लाख), महाबळेश्वर आढाळ ते इजिमा २९ रस्ता (१५ लाख), वारसोळी कोळी इजिमा २९ रस्ता (१५ लाख) असे एकूण १ कोटी २० लाख रुपये या रस्त्यांसाठी प्रशासकीय मंजुरी घेऊन निधी उपलब्ध केल्याने खंडाळा तालुक्यातील जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे. वाई खंडाळा महाबळेश्वर हा मतदारसंघ अतिशय मोठा व दुर्गम भागात विखुरलेला आहे. कोरोना माहामरीमुळे थाबलेली विकास यात्रा आता पुढे चालू होईल. मतदारसंघातील सर्व प्रकारचे प्रश्न आबा लवकरात लवकर मार्गी लावतील असा आम्हा कार्यकर्त्यांना विश्वास आहे.

गणेश नामदेवराव धायगुडे-पाटील
सरपंच खेड.बुद्रुक,ता.खंडाळा, जि.सातारा

Leave a Reply

%d bloggers like this: