लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, शिक्षकाला अटक

नागपूर : शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी पुण्यातील घटना ताजी असतानाच लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना आज (दि. 15 जुलै) येथे उघडकीस आली. अरबी भाषेचे शिक्षण देणाऱ्या एका कोचिंग क्लास शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार केले असून नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रफिक खान उर्फ मौलाना हाफिज असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीची आरोपी रफिक खानसोबत आधीपासून ओळख होती. आरोपी रफिक हा या विद्यार्थिनीला अरबी भाषा शिकवत असे. लॉकडाऊनच्या काळात आरोपीने पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना मदत करून आधी विश्वास संपादन केला. त्यानंतर पीडितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याने पीडित तरुणीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

साखरपुडयाचाही  घातला होता घाट

आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. मार्च महिन्यात त्याने पीडित तरुणीसोबत साखरपुडा करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र या संदर्भात बाल सुरक्षा अधिकाऱ्यांनी आरोपीचा हा प्रयत्न हाणून पाडत पीडितेची रवानगी बाल सुधारगृहात केली होती. काही दिवस तिथे राहिल्यानंतर तरुणी घरी परत आली. मात्र त्यानंतर सुद्धा आरोपी वारंवार भेटायला बोलवत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने आरोपी विरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.  पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: