Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

Pune – गेल्या चोवीस तासात 334 नवीन कोरोना रुग्ण 212 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव कमी झाला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 334 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे  तर 212 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 82 हजार 916 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 71 हजार 209 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8674 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 3033 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण  आहेत. यामध्ये 225 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात पुणे शहरातील विविध केंद्रावर 7696 स्वॅब  तपासणी करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading