योहान पुनावाला फाउंडेशन तर्फे पुणे पोलिसांच्या कोरोना काळातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी एक जीप भेट

पुणे : पुनावाला परिवार हा एक दानशूर परिवार म्हणून पुण्यात प्रसिद्ध आहे, विशेषकरून गरीबांसाठी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम प्रसिध्द आहे, आपल्या कार्याची ही परंपरा सुरू ठेवत आपल्या चातुर्यासाठी आणि वायझेडपी (YZP) या नावाने प्रसिद्ध योहान पुनावाला यांनी आपले कार्य वाढवले आहे. पुनावाला म्हणतात “माझे कुटूंब हे अनेक सामाजिक कार्यात सहभागी होत असते आणि हीच परंपरा काही चांगल्या कार्यांसाठी सुरू ठेवत शहरांतील आघाडीच्या अधिकार्‍यांसाठी करतांना मला आनंद होत आहे.”

कोविड १९ च्या साथी मध्ये शहरातील पोलिसांनी शहरांतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी निस्वार्थपणे दिलेल्या योगदानासाठी कृतज्ञ भावनेने योहान पुनावाला यांनी पुणे पोलिसांसाठी एक महिंद्रा जीप भेट म्हणून दिली. पुनावाला यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कडे नव्या जीपच्या चाव्या कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन मध्ये झालेल्या कार्यक्रमात सुपूर्द केल्या.

चाव्या सुपूर्द करतांना पुनावाला यांनी नमूद केले की पुणे पोलिस विभागाने निस्वार्थ पणे आपला जीव धोक्यात घालून या महामारीत धाडसी असे काम केले असून त्यांना बंदोबस्तावर बाहेर जातांना आवश्यक असेलेले सुरक्षित आणि वेगवान असे वाहन आवश्यक होते. “ कोविड-१९ ही एक अभूतपूर्व अशी परिस्थिती होती आणि अशा स्थितीत दररोज नवनवीन घडामोडी घडत होत्या. म्हणूनच मी नागरिकांना आवाहन करतो की पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करून अशा कठीण परिस्थितीत आपली सुरक्षा करण्यास त्यांना सहकार्य करावे. आम्ही पहिल्या फळीतील आरोग्य क्षेत्रासोबत पोलिस कर्मचार्‍यांना सहकार्य करतच आहोत पण त्याच बरोबर अशा साथीच्या काळात एक होऊन काम करत आहोत.” पुनावाला पुढे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: