कर्तव्य फाउंडेशनतर्फे बांगड व गरड यांचा सत्कार

पुणे :कर्तव्य फाउंडेशनतर्फे इंडीया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाल्याबद्दल रक्तदाते राम बांगड व माउंट हनुमान तिब्बा शिखर सर केल्याबद्दल गिर्यारोहक स्वप्नील गरड यांचा लष्करचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम व उत्तमनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांच्याहस्ते पुणेरी पगडी,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळेस फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, कार्याध्यक्ष अशोक देशमुख, पाॅवरलिफ्टर शाम साहनी,डाॅ.बंटी धर्मा, ग्रंथपाल दिलीप भिकुले,गजानन सोनावणे आदी उपस्थित होते.
रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांनी १३४ वेळा रक्तदान, १५ वेळा प्लाझ्मादान व २१ वेळा प्लेटलेट दान केले याची नोंद घेऊन इंडीया बुक ऑफ रेकॉर्डसने त्यांना सन्मानित केले व पोलीस नाईक, गिर्यारोहक स्वप्नील गरड यांनी नुकतेच ५९८३ मीटर उंचीवरील माऊंट हनुमान तिब्बा हे शिखर यशस्वीपणे सर केले आहे त्याबद्दल या दोघांचाही सन्मान करण्यात आल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी सांगितले,तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम व चांदगुडे यांनी आपल्या मनोगतातून बांगड व गरड यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळेस बांगड व गरड यांनी सत्काराला उत्तर देऊन आपले अनुभव कथन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील बाथम, उमेश गायकवाड, आकाश ढसाळ,सचिन कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: