कार्यातून जनतेसोबत तुमचे विश्वासाचे नाते तयार होते : चंद्रकांत पाटील

पुणे : कार्यालय म्हणजे आपल्या हक्काची जागा असून येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे समाधान झालेच पाहिजे. तुमच्या कार्यातून जनतेसोबत तुमचे विश्वासाचे नाते तयार होते. असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केला.

भाजयुमो पुणे शहर उपाध्यक्ष महेश पवळे यांच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर, नगरसेवक सुशील मेंगडे, वृषाली चौधरी, दीपक पोटे, छाया मारणे, डॉ श्रद्धा प्रभुणे, राजेश येनपुरे, सरचिटणीस गणेशजी घोष, दत्तात्रय खाडे, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी रिक्षा चालकांना कोरोना शिटस, तसेच रिक्षा चालकांचा १ लाख रुपये किमतीचा विमा काढून त्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जनसेवा मदत संपर्क सेवेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले हे ठिकाण नोकरीसाठी असलेले ऑफिस न राहता कार्यालय राहिले पाहिजे येथे येणाऱ्या प्रत्येकाचे काम झालेच पाहिजे. तरच स्थानिक नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते तयार होवू शकते.

भाजपा शहर अध्यक्ष यांनी यावेळी पक्षाच्या वतीने पुण्यामध्ये असलेल्या योजनांची माहिती नागरिकांना दिली . या कार्यक्रमाला कर्वेनगर मधील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव मुरकुटे यांनी केले .

Leave a Reply

%d bloggers like this: