महाराष्ट्राने लव्ह जिहादला थारा दिलेला नाही – उर्मिला मातोंडकर
पुणे: ‘ महाराष्ट्रात महाराष्ट्र धर्म सर्वात मोठा लव्ह महाराष्ट्राने लव्ह जिहादला महाराष्ट्रात थारा नाही. अन्याय कुठल्याही प्रकारात असू द्या त्याला विरोध करायलाच हवा. शिवसेनेकडून कुणी विरोध करत असेल तर मी त्यांना ही सांगेन. या गोष्टी राजकीय फायदा घेण्यासाठी असा विरोध होतो, असं मतअभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर ( Urmila Matondkar) यांनी व्यक्त केलं.
आज शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. उर्मिला मातोंडकर आणि महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुण्यातून अभियानाला सुरुवात झाली आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला ऊर्मिला यांनी राज्यातील घडामोडींबद्दल भाष्य केलं.
मी पुण्यात चार दिवसांचा दौरा केला होता. कुणाला ही सांगितलं नव्हतं. माध्यमांना ही नाही. नाहीतर नेते एक केळ देतात आणि चार फोटो टाकतात. पण त्याऐवजी मला काम करायला आवडतं. विधान परिषदेची आमदारकी मिळाली तर आनंदच होईल. पण,सध्या 12 आमदारांच्या यादीवर मी तोंडावर मास्क ठेवलेलं बरं आहे, असंही म्हणत ऊर्मिला यांनी आमदारकीची इच्छा बोलून दाखवली.
सचिन वाझे आणि माजी वनंमंत्री संजय राठोड यांचे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे यावर बोलणे योग्य ठरणार नाही. काही जण दिवसरात्र या विषयांवर ओरडत आहेत त्यावर मी काय बोलणार. कामाच्या गोष्टी बोलल्या पाहिजेत.लोकांच्या समस्या सोडून भलत्याच गोष्टींवर लोक बोलतात, असं म्हणत ऊर्मिला यांनी विरोधकांना टोला लगावला.
मुख्यमंत्र्यांनी पदभार घेतल्यापासून अत्यंत कठीण काळाचा सामना त्यांना करावा लागला आणि त्यांनी धीरोदत्त राहून केला. श्रेय देऊ द्यात किंवा नको देऊ द्यात पण देशात सर्वात उत्तम काम त्यांनी केलं. त्यांच्यावर अनेकांनी केली. पण त्यांना उत्तर देण्यात वेळ न घालवता विकासावर लक्ष केंद्रीत केलंय. ओरडणारे ओरडतच राहतील, असं म्हणत विरोधकांना टोला लगावला.
कोविड च्या कठीण परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले त्यांच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधीच भेटणार नाही त्यांनी दर आठवड्याला लोकांना धीर दिला लोकांची संवाद साधला मी तुमच्या पाठीमागे आहे असे सारखे म्हणाले
