Wednesday, June 17, 2026
Latest NewsSports

नोवाक जोकोविचने 20 वे विक्रमी ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद सहाव्यांदा पटकावले

सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच याने रविवारी टेनिस कोर्टवर इतिहास रचला. जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेल्या नोवाक जोकोविचने जेतेपदाच्या लढतीत इटलीच्या मॅटीयो बेरेट्टीनीला 6-7, 6-4, 6-4, 6-3 अशा चार सेटमध्ये पराभूत करीत सहाव्यांदा विम्बल्डन या टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या अजिंक्यपदासह नोवाक जोकोविचने रॉजर फेडरर व रफाएल नदाल यांच्या सर्वाधिक अन् विक्रमी 20 ग्रॅण्डस्लॅम जेतेपदांची बरोबरीही साधली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading