Sunday, September 6, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

… तर दरवर्षी घ्यावी लागेल कोरोनाची लस – ICMR

दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरात असून काही आठवड्यातच तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती असताना ICMRच्या तज्ञांनी एक नवीन मत मांडल आहे. काही काळानंतर कोविड- 19 हा इंफ्लुएंजासारखा होईल आणि दरवर्षी करोनाची लस घ्यायला लागू शकते, असे मत तज्ञांनी नोंदवल आहे.

देशात करोनाची दुसऱ्या लांटेची तीव्रता कमी झाली असली तरी संभाव्य तिसऱ्या लांटेची सज्ज राहण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी कोरोनाच्या संबंधीत असलेल्या नियमांचं पालन केले नाही तर येत्या 6 ते 8 आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेस सुरुवात होऊ शकते.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये डिवीजन ऑफ ऐपिडेमियोलॉजी आणि कम्युनिकेबल डिसीजचे प्रमुख समीरन पांडा यांनी सांगितलं की, काही काळानंतर, कोविड19 स्थानिक पातळीवर (भौगोलिक क्षेत्रातील लोकसंख्येमध्ये एखाद्या रोगाचा प्रसार होणे) पोहचेल.

देशात कोरोनाव्हायरस संक्रमणासंदर्भात केलेल्या गणितीय अभ्यासानुसार, भारतातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली. मात्र रिप्रोडक्टिव्ह नंबर किंवा आर नंबरमध्ये एप्रिलच्या मध्यानंतर पहिल्यांदा पुन्हा एकदा संख्येमध्ये वाढ दिसून आहे. आर नंबरला एक प्रकारचा गणितीय अंदाज देखील म्हटलं जाऊ शकतं. आधीच कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांच्या संपर्कात येऊन किती लोकांना संसर्ग झाला हे आर क्रमांक मोजते. हा आर नंबर जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कमी होत होता. मात्र 20 जूननंतर 7 जुलैपर्यंतच्या या कालावधीत त्यात झपाट्याने वाढ झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading