Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

Pune – रविवारी कोरोनाचे 287 नवीन रुग्ण, 228 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढायला लागला आहे आहे  आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची  संख्या  तीनशेच्या खाली आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन हजाराच्या खाली आहे.

मागील काही दिवसांपासून शहरामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक होती. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 287  नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 228रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 81 हजार 834 इतके कोरोना बाधित रुग्ण  आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 700हजार 97इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 15रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 10तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8652जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरामध्ये सध्या 3085अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 227 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6074 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading