नाना पटोले यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आंबेडकर चळवळीचे नेते मिलिंद अहिरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भाजप पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याचबरोबर नागपूर कारागृहाचे निवृत्त अधिक्षक हिरालाल जाधव यांनी त्यांच्या सहकार्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या प्रयत्नाने मिलिंद अहिरे व हिरालाल जाधव यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

 

यावेळी नाना पटोले म्हणाले की, ‘‘भारतीय जनता पक्ष नेहमी सत्ता मिळविण्यासाठी निवडणुकीच्या वेळी अनेक समाजातील नेत्यांना खोटे आश्वासने देऊन पक्षात समाविष्ट करून घेतात, परंतु फक्त निवडणुकीपुरताच भाजप त्यांचा वापर करते. मिलिंद अहिरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी योग्य वेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना काँग्रेस पक्षात योग्य स्थान देऊन त्यांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्यात येईल. हिरालाल जाधव यांच्या अनुभवाचा काँग्रेस पक्षाला फायदा होणार आहे.’’ मिलिंद अहिरे हे दलित पँथर व बहुजन समाजपार्टी पुणे शहराचे अध्यक्ष होते. पुणे शहरात अनेक आंदोलनात व मोर्चात त्यांचा सहभाग आहे. हडपसर मुंढवा येथील शिंदे वस्तीमधील राजू भंडारी आणि त्यांचे भाजप कार्यकर्ते निलेश सकपाळ, सागर लोंढे, तानाजी स्वर्गे, रमेश ढगारे, सुरज कांबळे, हाफिस मुजावर, संतोष जाधव, विश्वास पोखरकर, विनायक गोरडे, ओकांर सुरवसे, अनिकेत शिंदे, राकेश साठे, सचिन गरड आदींना नाना पटोले यांनी तिरंगी मफलर घालून पक्ष प्रवेश दिला. गौरव बोराडे यांच्या पुढाकाराने आणि नायनेश शिनलकर व विशाल जाधव यांच्या सहकार्याने हा प्रवेश पार पडला.

Leave a Reply

%d bloggers like this: