Sunday, June 21, 2026
BusinessLatest News

आगामी काळात चांदीच्या दरात वाढ होण्याचे संकेत

मुंबई : अमेरिकेच्या कामगार बाजारातील दमदार सुधारणा, डॉलरची वाढती किंमत, वाढती महागाई आदी कारणांमुळे चांदीच्या दरात गेल्या काही दिवसात प्रॉफिट बुकिंग झाल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

अमेरिकेतील कामगार बाजारातील आशावाद, पेंट अप मागणीमुळे तेलाच्या दरांतील वाढ, जगभरातील लसीकरणाचा वेग हे सर्व घटक चांदीच्या अस्थिरतेसाठी कारणीभूत ठरत आहेत. वाहन क्षेत्रातून वाढती मागणी, जागतिक स्तरावर कोव्हिड संसर्गाची वाढती संख्या, मध्यवर्ती बँकांनी तरलतेला दिलेले प्रोत्साहन या सर्वांमुळे मासिक स्तरावर चांदीच्या दरात वाढ होण्याचे संकेत असल्याचे माल्या यांनी दिले आहेत.

धातूच्या किंमतीतील अस्थिरता ही ट्रेडर्ससाठी चांगली असते. किंमतीच्या चढ-उतारांचा फायदा घेता येतो. एमसीएक्स फ्युचर्सवर (सीएमपी:रुपये.७०५००/kg) ७३००० रुपये प्रति किलो या गतीवरून चांगल्या शक्यता दिसतात. आंतरराष्ट्रीय बाजारात (सीएमपी:डॉलर२६.६/०z), डॉलर २८ हा आकडा मासिकदृष्ट्या आणखी सकारात्मक दिसतो. चांदीवर तेजी असल्याचे आम्ही मानतो, घसरणीवर खरेदी करणे हेच करड्या धातूतील स्पष्ट धोरण आहे.

करड्या धातूची उजळ बाजू

 सिल्व्हर इन्स्टिट्यूटद्वारे १० फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या विश्लेषणानुसार, चांदीचा औद्योगिक वापर आणि प्रत्यक्ष चांदीतील गुंतवणुकीमुळे २०२१ मध्ये चांदीची मागणी ६ वर्षातील उच्चांकी म्हणजेच १.०२५ अब्ज औसांवर पोहोचली. चांदीचे नाणे आणि बार खरेदी ही प्रत्यक्ष गुंतवणूक समजली जाते. त्यातील ६ वर्षातील वृद्धी २०२१ मध्ये २५७ दशलक्ष औसांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. कारण गुंतवणूकदार अजूनही त्यांच्या होल्डिंग्समध्ये चांदीचा समावेश करत आहेत.

२०२१ मध्ये आधीच, एक्सचेंज ट्रेडेड उत्पादनांमधील होल्डिंग ३ फेब्रुवारी रोजी विक्रमी पातळीवर म्हणजेच १.१८ अब्ज औसांवर पोहोचली. औद्योगिक मागणी २०२१ मध्ये ४ वर्षांतील उच्चांकावर म्हणजेच २०२० च्या आकडेवारीत ९ टक्क्यांची वृद्धी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चांदीच्या दागिन्यांतील जागतिक मागणी १७४ दशलक्ष औंसपर्यंत पुन्हा उसळी घेईल असा अंदाज आहे, मात्र ही आकडेवारी कोव्हिड पूर्वीच्या पातळीखालीच राहील. वाहन बाजारात चांदीचा वापरही २०२१ मध्ये प्रचंड वाढेल. तो ६० दशलक्ष औंसपर्यंत पोहोचेल. वाहनांच्या वाढत्या विद्युतीकरणाचा फायदा चांदीला होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading