सावता महाराज मंदिराचे लोकार्पण तसेच वसेकर महाराजांना आमदार रोहित पवारांकडून चारचाकी

कर्जत :ओवीजळगाव येथील संत सावता महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार आमदार रोहित पवार यांच्यातर्फे करण्यात आला. मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर यांना चारचाकी वाहन भेट दिले.

याप्रसंगी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे, नामदेव राऊत, मनीषा सोनमाळी, प्रा. विशाल मेहेत्रे, सुनील शेलार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आंबीजळगाव येथील संत सावता महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार आमदार पवार यांच्यामार्फत करण्यात आला. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या वेळी वाहन भेट आंबीजळगाव (ता. कर्जत) संत सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर यांना आमदार रोहित पवार यांच्यातर्फे वाहन भेट देण्यात आले.

मंदिरास जागा व इतर मदत करणाऱ्या दात्यांचा सन्मान करण्यात आला. आमदार पवार यांनी अरणगाव येथे रमेश महाराज वसेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यावेळी महाराजांचे जुने वाहन त्यांच्या निदर्शनास आले. आध्यात्मिक भावनेतून त्यांनी महाराजांच्या सेवेसाठी वाहन भेट देण्याचे आश्वासन दिले होते. या सोहळ्यात वसेकर महाराजांना वाहन भेट देऊन आमदार पवार यांनी आश्वासनाची पूर्तता केली.

Leave a Reply

%d bloggers like this: