Pune -गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 331 नवीन रुग्ण 253जणांना डिस्चार्ज
पुणे : शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे मागील काही दिवसापासून शहरात नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत आहे पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 331नवीन रुग्णांची नोंद झाले आहे तर 253रुग्णांना डिस्चार्ज
देण्यात आला आहे पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 80 हजार 150 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी 4लाख 80 हजार 913इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या चोवीस तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे यामध्ये शहरातील 13 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे आतापर्यंत पुणे शहरात 8636 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 6099 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. शहरांमध्ये सध्या 2941 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत त्यापैकी 244 रुग्ण गंभीर आहेत तर आज पर्यंत 4 लाख 69 हजार 336 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
