fbpx
Thursday, May 2, 2024
Latest NewsPUNE

कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल शेखर मुंदडा यांचा विशेष सन्मान

पुणे : महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक व आर्ट ऑफ लिविंगचे महाराष्ट्राचे अपेक्स मेंबर शेखर मुंदडा यांचा कोरोना काळात केलेल्या सेवेबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सन्मान देवदूतांच्या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.

शेखर मुंदडा म्हणाले, कोरोना काळात प्रत्येकाने दिलेले योगदान हे अमूल्य आहे. कोणत्याही संकटात समाजच समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो हीच आपली संस्कृती आहे. या पुरस्कराने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

महा एनजीओ फेडरेशन ही सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांच्या सक्षमतेसाठी काम करणारी संस्था आहे. आजपर्यंत कोरोना काळामध्ये या संस्थेमार्फत महाराष्ट्रामध्ये ५०० हुन अधिक एनजीओच्या माध्यमातून ३ लाख लोकांना मदत करण्यात आलेली आहे व आजही हे काम संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. या संस्थेमार्फत कोरोना काळामध्ये विविध उपक्रम राबविण्यासाठी जवळ जवळ ५०० एनजीओना २५ लाखांची आर्थिक मदत ही करण्यात आलेली आहे.

तसेच, शेखर मुंदडा यांच्या मागदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून ४ ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले गेले आहेत व तेथे नि:शुल्क उपचार दिले जात आहे. याशिवाय, आयएएचव्ही च्या माध्यमांतून अनेक महानगरपालिका व नगरपालिका यांना मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर , मास्क व बेड पुरविण्यात आले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading