इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे सायकल यात्रा आंदोलन

पुणे : मोदी सरकारच्या इंधन गॅस दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईविरोधात काँग्रेसचे आज पुण्यात सायकल यात्रा काढून जन आंदोलन करण्यात आले. कॅम्प मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते विधान भवन सायकल यात्रा काढून मोदी सरकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईविरोधात काँग्रेसने जन आंदोलन केले.

देश जनता की एक ही पुकार गदी छोडो ,मोदी सरकार देश की जनता की बडी भूल , चुन के दिया कमल का फूल नको नको, मोदी सरकार पुन्हा नको, ये सरकार निकमी है अशा घोषणा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व नेत्यांकडून मोदी देण्यात आल्या.

काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, प्रदेशचे उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, दत्ता बहिरट, अमीर शेख, गटनेते आबा बागुल, नगरसेवक रविंद्र धंगेकर, चंदूशेठ कदम, अविनाश बागवे, अजित दरेकर, मनीष आनंद, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, गोपाळदादा तिवारी, महिला अध्यक्षा सोनाली मारणे, युवक अध्यक्ष विशाल मलके, NSUI चे भुषण रानभरे, सेवादलाचे प्रकाश पवार व सेलचे प्रमुख या सायकल यात्रेमध्ये सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले की, ‘‘केंद्रातील मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठिण केले आहे. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तू महाग होत आहे. मोदी सरकारने जनतेला कोणताही दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला नाही. याउलट कर रूपाने करोडो रूपयांची लूट चालविली आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना केंद्र सरकारने भरमसाठ कर लावून जनतेची लूट केली आहे. केंद्र सरकारने डिझेल व पेट्रोलवर लावलेल्या भरमसाट एक्साईज ड्युटीमुळे यांचे दर वाढलेले आहे. आज पेट्रोलचे दर १०६ रू. लिटर तर डिझेलचे दर ९६ रू. लिटर झालेले आहे. स्वयंपाक गॅसचे दर ८५० रूपयांच्यावर गेलेले आहे. खाद्यतेल आणि डाळींचे भावही मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. या महागाईमुळे आज जनता त्रस्त झालेली आहे. या महागाईकडे मोदी सरकारने त्वरीत लक्ष घालून सामान्य जनतेला दिलासा दिला पाहिजे. असे न केल्यास काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडणार.’’

आंदोलनाच्या वेळी रमेश बागवे म्हणाले मोदी सरकारने पेट्रोल डिझेल गॅस दर वाढवून सामान्य जनतेची लूट केली आहे म्हणून आम्ही दहा दिवस हे आंदोलन पुकारले आहे  सामान्य जनता रिक्षावाले यांची लुट सरकारने केली आहे. सामान्य जनता रिक्षा वाले सगळे परेशान आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना साहेब पटोले यांनी सामान्य जनते ला महागाई मधून दिलासा भेटला पाहिजे यासाठी आज आम्ही सायकल यात्रा काडून आंदोलन करत आहोत.

मोहन जोशी म्हणाले, आम्हाला आमचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी सांगितले आहे की सर्वसामान्य जनतेला सूट मिळाली पाहिजे यासाठी आपण आंदोलन केले पाहिजे उद्यापासून अख्ख्या महाराष्ट्रात महिला सायकल रॅली काढणार आहेत व मुंबईत मोठी सायकल रॅली काढून या आंदोलनाची समाप्ती करणार आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: