Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

डीएमआरसीतर्फे भारतातील पहिल्या कॅशलेस मेट्रो पार्किंगचे काश्मीर गेट येथे एनईटीसी फास्टॅगसह उद्घाटन

नवी दिल्ली : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.च्या (डीएमआरसी) सहकार्याने आज भारतातील पहिल्या फास्टॅग/युपीआयवर आधारित 100 टक्के स्मार्ट आणि कॅशलेस पार्किंगचे काश्मीर गेट मेट्रो स्टेशन येथे उद्घाटन केले. ही कॅशलेस पार्किंग सुविधा काश्मीर गेट मेट्रो स्टेशन येथे डीएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगू सिंग यांच्या तसेच डीएमआरसी आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) वरिष्ठ अधिकाऱ्या उपस्थितीत लाँच करण्यात आले. मल्टी- मॉडेल इंटिग्रेशन (एमएमआय) उपक्रमाचा एक भाग म्हणून ऑटोटॅक्सी आणि ई- रिक्क्षासाठी इंटरमिडीएट पब्लिक ट्रान्सपोर्ट (आयपीटी) लेन्सचेही स्टेशनावर उद्घाटन करण्यात आले.

हे पहिले मेट्रो स्टेशन पार्किंग इन्स्टॉलेशन असून एनपीसीआय अशाप्रकारची सुविधा इतर ठिकाणीही उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा करत आहे. बहुतेक प्रवासी एनसीएमसी कार्ड वापरत असल्यामुळे ही सर्वसमावेशक सुविधा त्यांच्यासाठी सोयीस्कर तर असेलच, शिवाय त्यामुळे महामारीच्या काळात त्यांना सुरक्षितपणे पेमेंट करण्याचा पर्यायही मिळेल.

एनपीसीआय मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई आणि त्रिवेंद्रम या शहरांमध्ये संपर्कविरहीत कार पार्किंग सुविधेचा विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे. नागपूर आणि पुणे मेट्रो स्टेशन्सवर एनईटीसी फास्टॅगसह 100 टक्के संपर्कविरहीत पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एनपीसीआय या महानगरांसोबत चर्चा करत आहे. त्याशिवाय एनपीसीआय प्रमुख मॉल्स, विमानतळे, बंदरे, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके, हॉस्पिटल्स आणि देशातील इतर खासगी पार्किंग लॉट्स येथे एनईटीसी फास्टॅग पॉवर्ड संपर्कविरहीत पार्किंग सेवा सुरू करण्यासाठी चर्चा करत आहे. कंपनीला पार्किंग प्रकल्पांचे नेतृत्व करण्यासाठी प्रमुख बँकांकडून विचारणा होत आहे. विशेषत- भारतीय सरकारने 100 टक्के एनईटीसी फास्टॅग बंधनकारक केल्यापासून प्रमुख बँका या प्रकल्पांत रस दाखवत आहेत.

ही कॅशलेस पार्किंग सुविधा काश्मीर गेट स्टेशनच्या गेट क्रमांक 6 येतथे वसवण्यात आलेली असून 55 चार चाकी आणि 174 दुचाकी सामावून घेण्याची त्याची क्षमता आहे. फास्टॅगच्या मदतीने चारचाकीला प्रवेश/निर्गमन आणि पेमेंट करता येऊ शकते. पार्किंग शुल्क फास्टॅगद्वारे वजा होईल व पर्यायाने प्रवेश करण्यासाठी तसेच पैसे भरण्यासाठीचा वेळ खर्च होणार नाही. ही यंत्रणा पार्किंग लॉटमध्ये प्रवेश करताना व बाहेर पडताना लागणाऱ्या रांगा कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल आणि ग्राहकांना पार्किंगचा सुरक्षित व सोयीस्कर अनुभव घेता येईल.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading