तीन महिन्यात महापालिकेकडे ९०६ कोटीचा मिळकतकर जमा

पुणे: कोरोनामुळे मिळकतकर भरण्यासाठी अतिरिक्त एका महिन्याची सवलत दिली होती, ही मुदत बुधवारी संपली असून, तीन महिन्यात महापालिकेकडे ९०६ कोटीचा मिळकतकर जमा झाला.महापालिकेतर्फे १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत मिळकतकर जमा करणाऱ्यांना पाच ते दहा टक्के सवलत दिली जाते. यंदाही आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच कोरोनामुळे शहरात लॉकडाउन होता. त्यामुळे अनेक नागरिकांना मिळकतकर भरता आला नव्हता. त्यामुळे ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली होती.

एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत ११ लाख १५ हजार मिळकतधारकांपैकी ५ लाख ९२ हजार ३०८ मिळकतधारकांनी कर भरला आहे. महापालिकेकडे ९०६ कोटी रुपये जमा झाले आहेत. यामध्ये ४ लाख ४६ हजार ८९७ जणांनी ऑनलाइन, ७८हजार ४९२ जणांनी रोख, तर ६६ हजार ९१९ मिळकतधारकांनी चेकद्वारे कर भरला असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: