डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोठे फेरबदल झाले आहेत. आतापर्यंत अनेक केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधीच काही मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. यात आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांचाही समावेश आहे.

मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, माहिती व प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद, बाबुल सुप्रियो, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, देबोश्री चौधरी, संतोष गंगवार, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया आणि प्रताप सारंगी या नेत्यांना राजीनामा देण्यासाठी सांगण्यात आलं आहे.

कॅबिनेट विस्तारापूर्वी थावर चंद गहलोत यांना मंत्रिमंडळातून हटवून कर्नाटकचं राज्यपाल पद देण्यात आलं. ते सामाजिक न्याय मंत्री होते. त्याशिवाय गहलोत यांच्याकडे राज्यसभा सभागृहाचं सदस्यपद आणि भाजपाच्या संसदीय मंडळाचंही पद होते.

Leave a Reply

%d bloggers like this: