खा.डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासमोर ‘अंकनाद’ प्रणालीचे प्रात्यक्षिक

पुणे : मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि आणि ‘अंकनाद ‘ ऍप च्या वतीने ‘संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष खा.डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांना अंकनाद प्रणालीचे प्रात्यक्षिक मोबाईल अॅप, गणितासाठी उपयुक्त अशा एमपीथ्री प्लेयरद्वारे दाखविण्यात आले. मराठी, हिंदी, इंग्रजीतील या प्रणालीचे हे प्रात्यक्षिक होते. ही प्रणाली सर्व शाळापर्यंत पोचावी, सर्व विद्यार्थ्यांना उपयोग होईल, असे मत खा.डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी यावेळी व्यक्त केले.

पाढे स्पर्धा, गणितालय अशा माध्यमातून ‘अंकनाद’ हे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. सात्मीकरण प्रणाली ( अॅसीमीलेशन ) श्रवण संस्कार होऊन आत्मसात होणे महत्वाचे आहे.मूलभूत गणित संकल्पना समजून घेण्यासाठी अंक नाद सात्मीकरण प्रणाली उपयुक्त आहे,असे मंदार नामजोशी यांनी या प्रात्यक्षिका दरम्यान सांगितले.

वीरेंद्र चंपानेरकर, सुजय पत्की,मंदार नामजोशी,वैशाली लोखंडे हे यावेळी उपस्थित होते.

भारतीय गणिती वारसा पुढे आणण्यासाठी,आपल्या इतिहासात दडलेले गणिती वैभव पुढे आणण्यासाठी भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’ ग्रंथावरील वेबीनार मालिका,राज्य मराठी संस्थेच्या सहकार्याने राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा,विविध क्षेत्रातील तज्ञासमवेत गणिताचे महत्व मांडणाऱ्या वेबिनार मालिका मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि आणि ‘अंकनाद ‘ ऍप च्या माध्यमातून आयोजित केल्या जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: