Big News – माऊलींच्या पालखी सोहळ्यातील 20 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह

आळंदी: आषाढी वारीला सुरुवात होत असतानाच आता कोरोनानं शिरकाव केल्याची माहिती मिळाली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी निवडण्यात आलेल्या 100 वारकऱ्यांपैकी 2 जणांना कोरोनाची लागण झाली. ही माहिती मिळताच काहीसं गोंधळाचं वातावरण झालं. इतकच नाही तर दर्शनासाठी आलेल्या लोकांपैकी 20 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

50 लोकांना माऊलीच्या दर्शनासाठी परवानगी टप्प्या टप्प्यानं देण्यात आली होती. त्यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 164 जणांचे रिपोर्ट आले असून 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. उद्या माऊलीचं प्रस्थान दुपारी होण्याची शक्यता असतानाच आता वारकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: