पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांचा सन्मान

पुणे : उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांना विशेष शाखेतील उत्तम कामगिरीकरीता “पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह” मिळाल्याबद्दल कर्तव्य फाउंडेशनतर्फे त्यांचा पुणेरी पगडी,शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे,कार्याध्यक्ष अशोक देशमुख, पाॅवरलिफ्टर शाम साहनी, ग्रंथपाल दिलीप भिकुले व पोलीस नाईक अमोल राऊत उपस्थित होते.
वैशाली चांदगुडे यांनी विशेष शाखेत भरोसा सेल मध्ये जेष्ठ नागरिक व महिला विभागात उत्तम कामगिरी बजावली होती तसेच सामाजिक सुरक्षा विभागातही त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली होती.त्यांना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते नुकतेच पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले त्याबद्दल फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: