टीव्हीएस मोटर कंपनीतर्फे प्रगत तंत्रज्ञानासह “TVS iQube Electric” स्कूटर पुण्यात सादर

पुणे : जागतिक पातळीवर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचे नामांकित उत्पादक असणाऱ्या टीव्हीएस मोटर कंपनीने त्यांची TVS iQube Electric स्कूटर सादर करत असल्याचे आज पुण्यात जाहीर केले. TVS iQube Electric ही प्रदूषणविरहीत, अत्याधुनिक टीव्हीएस स्मार्टक्सोनेक्ट आणि प्रगत इलेक्ट्रिक ड्राईव्ह ट्रेन सुविधा यांनी युक्त शहरात चालवायला आनंद देणारी स्कूटर आहे.

या सादरीकरणावेळी बोलताना टीव्हीएस मोटर कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के.एन.राधाकृष्णन म्हणाले, “ग्राहक केंद्री नाविन्यपूर्णता दृष्टिकोनावर टीव्हीएस मोटर कंपनीचे काम चालते. भारताची प्रगती होत असताना देशातील गतिशीलता सुविधाही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. विशेषकरून भारतीय तरुण पिढीत. ‘हरित आणि जोडलेला भारत’ आणि येथील तरुणाई यांच्यावर भर देताना तीच दृष्टी आम्ही टीव्हीएसच्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ वरही ठेवली आहे. TVS iQube Electric ही अत्याधुनिक टीव्हीएस स्मार्टक्सोनेक्ट आणि प्रगत इलेक्ट्रिक ड्राईव्ह ट्रेन सुविधा यांनी युक्तआहे. बंगळूरू, दिल्ली आणि चेन्नई याठिकाणी मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आम्ही आमची इलेक्ट्रिक स्कूटर पुण्यात सादर करण्यासाठी उत्सुक आहोत. येथेही आम्हांला चांगला प्रतिसाद मिळेल याचा विश्वास आहे. TVS iQube Electric साठीची सगळी व्यवस्था डिजीटल रुपात आहे. ग्राहकांना गाडीची नोंदणी करणे सुलभ जावे आणि पैसे ऑनलाईन भरता यावेत यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्मची सोय करण्यात आली आहे. जोडीलाच संपर्करहित वितरणासाठीही उपलब्ध आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: