युवा सेनेच्या वतीने कलाकार, सफाई कामगार यांचा सत्कार व किट वाटप

पुणे : युवासेनेचे वतीने कोरोना योद्धा सफाई कामगार,तसेच कलाकार यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना किराणा किट,छत्री देण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन युवसेना कसबाचे विभागप्रमुख निरंजन दाभेकर,यांनी केले. मोदी गणपती चौक यथे कोरोंनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला.या प्रसंगी आयोजक निरंजन दाभेकर, बाळासाहेब दाभेकर, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, माजी शहर प्रमुख रामभाऊ पारीख, नगरसेवक विशाल धनवडे, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले, प्रिया बेर्डे, संदीप पाटील, ऋषिकेश आबा बालगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना प्रिया बेर्डे यांनी या कोरोना काळात सफाई कर्मचार्‍यांनी आरोग्य रक्षणात मोठी भूमिका बजावली आहे. मात्र या कोरोना काळात कलाकार लोकांचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे.म्हणून आरोग्य कर्मचारी व कलाकार यांना मदतीचा युवसेनेच हा उपक्रम स्तुत्य आहे असे संगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: