‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपाटाचे शूटिंग पूर्ण

संजय लीला भन्साली दिग्दर्शित आणि आलिया भट्ट स्टारर ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना उत्सुक्ता आहे. या चित्रपाटाचे शूटिंग नुकतेच संपले असून आलिया भट्टने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट शेयर करीत ही माहिती दिली आहे. ‘तब्बल दोन वर्षांनंतर ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लोकडाऊन व वादळाचा सामना करणाऱ्या या सेटवरचा चित्रीकरणाचा प्रवास हाच  एक वेगळा चित्रपट आहे’, असे लिहीत आलियाने संजय लीला भन्साली सोबतचा फोटो शेयर केला आहे. दरम्यान, ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे  चित्रिकरण मुंबई फिल्म सिटी, गोरेगाव येथे झाले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: