Big Breaking पुण्यात शनिवार-रविवार सर्व दुकाने, मॉल्स बंद राहणार

पुणे – पुणे महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल्स, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर आदी शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहणार आहेत. रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार आणि रविवार केवळ पार्सल सेवा देता येणार आहे. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

अनलॉकनंतर अनेक व्यापार्‍यांमध्ये शनिवार आणि रविवार दुकाने उघडली राहण्यास परवानगी आहे की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र, आता पुण्याच्या महापौरांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

–अत्यावश्यक सेवेची दुकाने आठवडयातील सर्व दिवस सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील.

रेस्टॉरंंट, बार, फुड कोर्ट हे शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवेकरिता रात्री 11 पर्यंत सुरू राहतील.

कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरूस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाजी विक्री करणारे दुकाने / गाळे हे आठवडयातील सर्व दिवस सुरू राहतील.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवारी पुर्णपणे बंद राहतील.

सदरील आदेश हे पुणे मनपा क्षेत्रामध्ये येणार्‍या पुणे कॅन्टोंमेंट बोर्ड व खडकी कॅन्टोंमेंट बोर्ड यांना देखील लागू राहतील.

Leave a Reply

%d bloggers like this: