भारतीयांना लवकरच ‘झायडस कॅडिला’ ही चौथी कोरोना लस मिळणार
नवी दिल्ली : कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लसीकरण सुरू आहे. भारतात सध्या कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या तीन कोरोना लसींचा वापर लासिकरणासाठी केला जात आहे. आता यामध्ये ‘झायडस कॅडिला’ या लसीची भर पडणार आहे. झायडस कॅडिला या कंपनीच्या वतीने येत्या आठवड्यात ‘झायडस कॅडिला’ या लसीच्या आपतकालीन वापराच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात येणार आहे.
लवकरात लवकर भारतीयांचे लसीकरण करणे हे केंद्रीय आरोग्य विभागासाठी मोठे टास्क आहे. त्यात कोरोना लसींचा तुटवडा देशभरत जाणवत आहे. अशा वातावरणात आणखी एक लस भारतात उपलब्ध होणे ही दिलासादायक बाब आहे. कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या तीन लसीना भारत सरकारने आपत्कालीन वापरासाठी नुकतीच मंजूरी दिली आहे. अहमदाबाद येथील फार्मा कंपनी झायडस कॅडिला हे फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठे नाव आहे. याच कंपनीने ही लस बनविली असून तिचे नाव ZyCoV-D असे आहे. ज्याचे उत्पादन जूनपासून सुरू होणार असल्याचे गेल्या काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते.
