पुणे ग्रामीण भागात नवीन 10 बसमार्ग सुरू होणार

पुणे : ग्रामीण भागातून दररोज शहरामध्ये येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील तसेच पीएमआरडीए हद्दीतील ग्रामिण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी नवीन 10 बसमार्गा सुरू करण्यात येणार आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात ग्रामीण भागात नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे.  या बसमार्गांना प्रवासी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्या अनुषंगाने नवीन 10 बसमार्गांचे नियोजन  करण्यात येत असल्याचे पीएमपीकडून कळवण्यात आले आहे.

येत्या 20 जूनपासून नव्याने सुरू होणारे बसमार्ग पुढील प्रमाणे –

  1. कात्रज ते विंझर मार्गे नसरापूर, आंबवणे
  2. हडपसर ते वरवंड मार्गे यवत चौफूला
  3. हडपसर सासवड ते उरूळी कांचन मार्गे शिंदवणे घाट
  4.  हडपसर ते वडकीगांव मार्गे फुरसूंगी
  5. घोटावडे फाटा ते हिंजवडी फेज 1 मार्गे रिहेफाटा
  6. कात्रज ते वडगांव मावळ मार्गे कात्रज बायपास

दिनांक 23 जूनपासून नव्याने सुरू होणारे बसमार्ग –

  1. मार्केटयार्ड ते लव्हार्डे गांव मार्गे पिरंगुट, खारावडे
  2. डेक्कन ते मुठागांव मार्गे वारजे माळवाडी
  3. पुणे स्टेशन ते पौडगांव मार्गे पिरंगुट, दारवली
  4. नवीन भोसरी ते मंचर मार्गे चाकण, राजगुरूनगर (मार्गाच्या नियोजनाचे कामकाज सुरू)

 

Leave a Reply

%d bloggers like this: