आला पावसाळा आरोग्य सांभाळा

पावसाळा म्हटला की हिरवे रान, थंडगार वार, गरमागरम भाजी आणि वाफाळलेला चहा हे लगेच डोळ्या समोर येते. पण या आल्हादायक वातावरणा सोबतच पावसाळा घेवून येतो आजार आणि अस्वच्छतेमुळे पसरणारी रोगराई. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळयात नागरिकांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने ते फार महत्वाचे आहे. या पावसाळ्यात नागरिकांनी काय करायचे आणि काय टाळाचे, नागरीकांनी आरोग्याची काळजी कशी घ्यायची यासाठी काही टिप्स. पावसाळयात घ्यावयाची काळजी –
 1. पावसात भिजणे सहसा टाळावे आणि भिजल्यास कोरड्या टॉवेलने अंग व केस कोरडे करावे.
 2. ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नये.
 3. बॅगमध्ये मोठा रूमाल आणि एक्स्ट्रा फेस मास्क ठेवावा. ओला मास्क वापरणे टाळावे.
 4. पावसात भिजल्यास घरी आल्यावर प्रथम अंघोळ करावी आणि मग कोरडे कपडे घालावेत.
 5. अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्यास त्वचेला होणारे जंतुसंसर्ग टाळता येतात.
 6. केस, कपडे ओले असताना वातानुकूलित जागेमध्ये जाणे टाळावे. त्यामुळे व्हायरल फिव्हर, सर्दी, खोकला, असे आजार होण्याची शक्यता असते.
 7. आपले घर, घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच घराच्या आजूबाजूला कुंड्यांमध्ये पाणी साठत असेल तर वेळोवेळी ते काढावे. त्यामुळे साठलेल्या पाण्यात होणारी डासांची पैदास थांबेल.
 8. घरातील भांडी, कपडे कोरडे ठेवावेत.
आहाराविषयी काळजी –
 1. बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे.
 2. रस्त्यावरील कुल्फी, फळांचे रस पिणे टाळा.
 3. अती तळलेले, मसालेदार, आंबट, अती थंड पदार्थ खाणे टाळा.
 4. मासांहार करणा-या व्यक्तींनी या दिवसात मासे खाणे टाळावे कारण हा मौसम माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.
 5. आहारात आले, गवती चहा, हळद, तूप, भाज्यांचे सूप, ताज्या भाज्यांचा समावेश असावा.
 6. पचायला हल्याक्या पदार्थांचा समावेश जेवणात करावा.
 7. गरम जेवणाचे सेवन करावे

Leave a Reply

%d bloggers like this: