Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

सृजनात्मक व नवनिर्मितीतून सामाजिक विकास – रामजी राघवन


पुणे – “ निरिक्षण करणे, सतत प्रयोगशील असणेे, जागृत राहूण जिज्ञासू व्यक्ती बनणे आणि संशोधनात्मक गोष्टींना प्रत्यक्षात उतरविणे हे एका चांगल्या संशोधकाचे गुण आहेत. ज्याला सतत प्रश्न पडतात, सृजनात्मकता आणि नवनिर्मितीवर जो भर देतो ती व्यक्ती प्रगती पथावर असते. कोविड काळानंतर जिज्ञासा, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या आधारावर भारताला सशक्त करू शकू.” असे विचार अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रामजी राघवन यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित ऑनलाइन व्याख्यानमाला-२०२१ आयोजित करण्यात आली याचे प्रथम पुष्प गुंफताना प्रमुख वक्त्ये म्हणून ते ‘कोविडचे आजचे आव्हान आणि उद्याच्या नेतृत्वाची संधी’ या विषयावर बोलत होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्र कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, इंजिनियरिंग विभागाचे अधिष्ठात डॉ. प्रसाद खांडेकर आणि डॉ. श्रीनिवास सुब्बाराव हे उपस्थित होते.

डॉ. राम राघवन म्हणाले,“ कोणत्याही कामाची सुरूवात ही सकारात्मक विचारांनी करावी. आज अगस्तसारखी संस्था ही संशोधनात्मकतेचा डीएनए आहे. येथे गुणवत्तापूर्ण संशोधनावर अधिक महत्व देऊन विद्यार्थींची निर्मिती केली जाते. कोविडच्या काळानंतर देशात मोठे बदल होणार आहे. यात अगस्त संस्था एक आंदोलक म्हणून समोर येईल. कोणतीही समस्या ही संधी घेऊन येते. या देशात हेच घडले आणि आज शिक्षण क्षेत्रात ऑनलाइन शिक्षण पद्धती आली हे याचे उत्तम उदाहरण आहे.”
“ नवेे लक्ष निर्धारित करून सदैव वाटचाल करावी. व्यक्तीच्या जीवनात आलेले वादळ ही त्याची प्रतिभा आणि रचानात्मक कार्याची एक उंच उडी असते. संशोधनाच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांचे समाधान होणे गरजेचे आहे. कोणत्याही संस्थेत स्पिरीट ऑफ केयरिंग तत्वाचे पालन केले गेले तर लोक सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील. जीवनात ज्या वेळी अनिश्चिता असते त्यावेळी आपली मनःस्थिती बदलावी. त्यातून यशाचे दरवाजे आपोआपच उघडले जातात.”
“ १९९९ मध्ये स्थापन केलेल्या अगस्त्य या संस्थेची नाळ ही गुणवत्तापूर्ण संशोधनावर आधारलेली आहे. संस्थेने मोबाइल लॅबवर अधिक भर देऊन खेडोपाडी जाऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले. सकारात्मक मानसिकता, नवनिर्मितीची प्रेरणा आणि दृष्टीकोनातून देशात चांगले कार्य घडेल.”

राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न या विद्यापीठात केला जाता आहे. सामाजिक नवनिर्मिती हा मंत्र विद्यार्थ्यांमध्ये रुजविला जात आहे. नवनविन कल्पना वाव देऊन शिक्षण दिले जाते. पुढील काळात शिक्षणाची परिभाषा बदलून पारंपारीक शिक्षणाची पद्धत बदलून आधुनिकतेची कास धरली पाहिजे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading