डोडला डेअरी लिमिटेडची इनिशिअल पब्लिक ऑफर १६ जून रोजी खुली होणार
मुंबई – डोडला डेअरी लिमिटेड आपले इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (“ऑफर”) जून १६, २०२१ रोजी खुले करणार आहे. या ऑफरचा प्राइस बॅण्ड प्रति इक्विटी शेअर ४२१ ते ४२८ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. किमान ३५ इक्विटी शेअर्स व त्यानंतर ३५च्या पटीत इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येणार आहे.
आयपीओमध्ये ५०० दशलक्ष रुपये एकत्रित मूल्याचे ताजे जारीकरण (फ्रेश इश्यू) आहे आणि विक्रीसाठीचा प्रस्ताव १०,९८५,४४४ इक्विटी शेअर्सपर्यंत आहे. विक्री प्रस्तावामध्ये टीपीजी डोडला डेअरी होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडच्या (”इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर” ) ९,२००,००० इक्विटी शेअर्सचा, डोडला सुनील रेड्डींच्या ४१६,६०४ इक्विटी शेअर्सचा आणि डोडला फॅमिली ट्रस्टच्या (”प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स”)१,०४१,५०९ इक्विटी शेअर्सचा तसेच डोडला दीपा रेड्डींच्या ३२७,३३१ इक्विटी शेअर्सचा (”प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर”) समावेश आहे.
ही ऑफर बुक बिल्डिंड प्रोससेमार्फत, सिक्युरिटीज काँट्रॅक्ट्स (नियमन) नियम, १९५७च्या सुधारित स्वरूपातील (“एससीआरआर”) नियम क्रमांक १९ (२) (बी) तसेच सेबी आयसीडीआर नियमनांच्या नियम क्रमांक ३१ नुसार व सेबी आयसीडीआर नियमनांमधील नियम ६(१) चे पालन करून दिली जात आहे. यानुसार क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (”क्यूआयबी”) वितरणासाठी ऑफरचा जास्तीत-जास्त ५० टक्के भाग प्रमाणबद्ध रितीने उपलब्ध केला जाऊ शकतो (”क्यूआयबी पोर्शन”). यासाठी आमच्या कंपनीने व सेलिंग शेअरहोल्डर्सनी बीआरएलएमशी चर्चा करून क्यूआयबी पोर्शनचा ६० टक्क्यांपर्यंतचा भाग (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”) अँकर इन्व्हेस्टर्सना विवेकबुद्धीच्या आधारे वितरित करणे आवश्यक आहे. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनचा एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव ठेवण्यात येईल. यासाठी देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून अँकर इन्व्हेस्टर अलोकेशन प्राइसएवढ्या किंवा त्याहून अधिक रकमेची वैध बोली, सेबी आयसीडीआर नियमांची पूर्तता करून, येणे आवश्यक आहे. क्यूआयबी पोर्शनचा ५ टक्के भाग (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळता) केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणबद्ध रितीने वितरित करण्यासाठी उपलब्ध राहील आणि क्यूआयबीचा उर्वरित भाग सर्व क्यूआयबी बिडर्सना (अँकर इन्व्हेस्टर्स वगळता) प्रमाणबद्ध रितीने वितरणासाठी उपलब्ध राहील. यांमध्ये ऑफर प्राइसएवढ्या किंवा त्याहून अधिक रकमेच्या वैध बोली लावणाऱ्या म्युच्युअल फंडांचाही समावेश असेल. मात्र, म्युच्युअल फंडांकडून झालेली एकत्रित मागणी क्यूआयबी पोर्शनच्या ५ टक्क्यांहून कमी असेल, तर म्युच्युअल फंड पोर्शनमधील उर्वरित इक्विटी शेअर्स उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वर्ग केले जातील आणि त्याचे सुयोग्य वितरण क्यूआयबींना केले जाईल.
याशिवाय ऑफरचा किमान १५ टक्के भाग नॉन–इन्स्टिट्युशनल बिडर्सना प्रमाणबद्ध रितीने वितरित करण्यासाठी उपलब्ध ठेवला जाईल आणि ऑफरचा किमान ३५ टक्के भाग सेबी आयसीडीआर नियमांची पूर्तता करून आरआयबींना वितरित करण्यासाठी उपलब्ध ठेवला जाईल. यासाठी त्यांच्याकडून ऑफर प्राइसएवढ्या किंवा त्याहून अधिक रकमेची वैध बोली येणे आवश्यक असेल. सर्व संभाव्य बिडर्सनी (अँकर्स इन्व्हेस्टर्स वगळता) अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (“एएसबीए”) प्रक्रिया उपयोगात आणणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेद्वारे त्यांच्या बँकखात्यांचे (यामध्ये यूपीआय यंत्रणा वापरणाऱ्या आरआयबींच्या यूपीआय आयडींचाही समावेश होतो) तपशील पुरवले जातील. एससीएसबी किंवा स्पॉन्सर बँक यापैकी जे काही लागू असेल त्यांच्याद्वारे संबंधित बिड अमाउंट्स या खात्यांमध्ये ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्व्हेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमार्फत ऑफरमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.
