Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

‘लायन्स क्लब इंटरनॅशल’तर्फे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना मानद सदस्यत्व

पुणे: सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना वैश्विक स्तरावरील सर्वात मोठी सेवा संस्था असलेल्या लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले. ‘लायन्स क्लब’चे माजी प्रांतपाल डॉ. चंद्रहास शेट्टी यांनी प्रा. डॉ. चोरडिया यांना सभासदत्वाचे मानपत्र प्रदान केले.

याप्रसंगी संगणक तज्ज्ञ व रोटरी क्लब इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर, ‘सूर्यदत्ता’च्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते. लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या शताब्दी सोहळ्यात डॉ. चोरडिया यांना ‘लायन्स सेंटिनिअल पुरस्कार’, तसेच ‘लायन्स समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते.


सदस्यत्व स्वीकारल्यानंतर डॉ. चोरडिया म्हणाले की, “गेल्या दोन दशकांपासून सूर्यदत्ता ग्रुप विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्याचे आणि त्यांना चांगले शिक्षण देण्याचे काम करत आहे. मुख्य शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम आम्ही राबवतो. तसेच जगातील नामांकित विद्यापीठांचे अभ्यासक्रम त्यांच्यासाठी उपलब्ध केले जात आहेत. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळण्यासाठी विविध प्रशिक्षण सत्रे घेतली जातात. विद्यार्थ्यांमध्ये कुटुंब, देशाप्रती सेवाभाव रुजावा, त्याने आत्मनिर्भर आणि जबाबदार व्यक्ती बनावे, यासाठी सूर्यदत्ता संस्था सर्वतोपरी प्रयत्न करते. सूर्यदत्ता संचालित सर्वच संस्था आयएसओ ९००१-२०१५ एनव्हीटी-क्यूसी-यूएसए सह प्रमाणित आहेत.”


डॉ. चंद्रहास शेट्टी म्हणाले, “सूर्यदत्ता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण व सामाजिक क्षेत्रात प्रा. डॉ. चोरडिया यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यांचे सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने त्यांना मानद सभासदत्व प्रदान करण्यात आले आहे. येत्या काळात सूर्यदत्ता ग्रुप व लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या एकत्रित प्रयत्नातून आणखी भरीव सामाजिक कार्य केले जाईल.”


डॉ. दीपक शिकारपूर यांनी डॉ. संजय चोरडिया यांचे अभिनंदन केले. प्रखर सामाजिक जाणीव आणि जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्नशील असलेल्या डॉ. चोरडिया यांचा हा उचित सन्मान आहे. जागतिक स्तरावरील सामाजिक संस्था असलेल्या लायन्स क्लबकडून त्यांना आपले सामाजिक कार्य विस्तारण्याची एक नामी संधीच मिळाली आहे. त्यांच्याकडून असेच उल्लेखनीय सामाजिक कार्य होत राहील.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading