मराठा आरक्षण – मुख्यमंत्री बोलकी बाहुली आहेत का? विनायक मेटे यांचा सवाल

पुणे – मुख्यमंत्री बोलकी बाहुली आहेत का ? मुख्यमंत्र्यांना कोण जर कोणी आरक्षण देण्यापासून थांबवत असेल तर ते त्यांनी जाहीर करावं असा पलटवार शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी  मराठा आरक्षणाविषयी  भूमिका मांडली. पवार, चव्हाण आम्हाला महत्वाचे नाहीत. मुख्यमंत्र्यांनी नीट जाहीर करावं की त्यांची पंतप्रधानांशी काय चर्चा झाली असे मेटे म्हणाले.


पुण्यामध्ये आज विनायक मेटे यांनी  पत्रकार परिषद  घेवून भूमिका जाहीर केली. प्रत्येक जिल्ह्यात आरक्षणासाठी मेळावे घेणार असून त्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू करणार असल्याचं मेटेनी यावेळी सांगितलं. प्रत्येक पक्षाचा नेत्यांनी आपल्या पक्ष नेत्यांशी बोलून भूमिका स्पष्ट करावी तसेच सरकार ने आरक्षणा बाबत नेमके काय धोरण आहे ते स्पष्ट करावे असे मेटे म्हणाले. अन्यथा आपण अधिवेशन होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. त्याच बरोबर आरक्षणाच्या मागणीसाठी २७ जून ला १० हजार जणांची मोटर सायकल ची रॅली मुंबईत काढणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं.

या सरकारचा रिमोट कंट्रोल म्हणून शरद पवारांकडे बघितलं जातं याबाबत बोलताना मेटे म्हणाले,”सत्तेचा बाहेर कोण मार्गदर्शन करते कोण रिमोट कंट्रोल याला महत्त्व नाही. मुख्यमंत्री बोलकी बाहुली आहेत का? त्यांना कोणाचा अडथळा असेल तर ते त्यांनी जाहीर करावं की मला आरक्षण द्यायची इच्छा आहे पण हे आडवे येत आहेत.या सरकार का मराठा समाजाचा बाबतीत काही देणं घेणं नाही. त्यांचा मनामध्ये पाप आहे हे स्पष्ट होत आहे. “
मोदींचा भेटीत मराठा आरक्षणाचा प्रश्न फक्त तोंडी लावण्यापुरता घेतला असा आरोप मेटेंनी केलाते म्हणाले ,”अशोक चव्हाण वगैरे बाबत मला काही बोलायचे नाही.ते नाकर्ते आहेत. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी नेमकी काय चर्चा झाली ते स्पष्ट करावं”
आपल्या कडून ५ जणांची कायदेशीर सल्लागार समिती नेमली जाणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले. एका महिन्यात या समितीचा अहवाल आला की सरकारशी चर्चा करू असे मेटे म्हणाले

Leave a Reply

%d bloggers like this: