अमेझॉन ने पहिल्या फळीच्या १ लाख कर्मचा-यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण केले

पुणे : तीन आठवड्यापूर्वी आपला ऑन साइट  कोव्हिड -१९ लसीकरण उपक्रम सुरू केल्यानंतर आजवर अमेझॉन इंडिया ने पहिल्या फळीचे सहकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा १ लाख व्यक्तीं चे लसीकरण पूर्ण केले आहे. प्रमुख महानगरे आणि लुधियाना, रांची, रायपूर अशा इतर शहरे मिळून २६ शहरांमध्ये परवानाधारक आरोग्यसेवा संस्थांच्या सहकार्याने हे ऑन  साइट लसीकरण होत आहे. येत्या काही आठवड्यांत म्हैसूर, सुरत, इंदूर यांसह इतर शहरांत असे ऑन  साइट लसीकरण उपक्रम कंपनी आयोजित करणार आहे.  

ही ऑन  साइट लसीकरण मोहीम म्हणजे अमेझॉन इंडिया च्या कर्मचारी, व्यावसायिक भागीदार, लघु-मध्यम विक्रेते आणि त्यांचे कुटुंबीय अशा १० लाख व्यक्तीना लसीकरण सहज उपलब्ध करून देण्याच्या निर्धाराला पुष्टी देण्याचा प्रयत्न आहे.  

अमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस चे संचालक अभिनव सिंग म्हणाले, “आमच्या सर्व टीम चे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून  कर्मचारी, व्यावसायिक भागीदार, लघु-मध्यम विक्रेते आणि त्यांचे कुटुंबीय यांना लसीकरण सहज उपलब्ध करून दिले जात आहे. आमचे कर्मचारी, ग्राहक आणि ज्या समाजात आम्ही व्यवसाय करतो त्याची सुरक्षितता याबद्दलची आमची वचनबद्धता यातून अधोरेखित होत आहे. आजवर अमेझॉन इंडिया चे पहिल्या फळीचे सहकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा १ लाख पेक्षा जास्त  व्यक्तींना लस  दिली आहे . आणि  आमचे पहिल्या फळीचे सहकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना येत्या काही आठवड्यांत लस टोचून घेणे शक्य व्हावे यासाठी कंपनी अथक प्रयत्न करीत आहे. आमच्या या प्रयत्नांना साथ देणा-या सरकारी अधिकारी आणि आरोग्यसेवा संघटनांचे आम्ही आभारी आहोत,”

लस उपलब्ध असलेल्या हॉस्पिटल मध्ये  लसीकरण, खर्चाची भरपाई, आणि ऑन साइट  स्वतःच्या आवारात लसीकरण  अशा सर्व मार्गानी अमेझॉन इंडिया आपल्या कर्मचा-याना  लसीकरणासाठी उत्तेजन देत आहे. 

“मला स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लसीकरणाची गरज होती,” असे अमेझॉन इंडिया चा पॅकिंग असोसिएटसिकंदर सिंग म्हणाला.“आम्ही जिथे काम करतो तिथेच लसीकरण उपलब्ध होणे ही चांगली गोष्ट आहे आणि अमेझॉन ने केलेल्या व्यवस्थेमुळे मला लस मिळाली याचे मला समाधान आहे. सर्वानीच कोव्हिड -१९  लस टोचून घेतली पाहिजे.

Leave a Reply

%d bloggers like this: